प्रत्येक राजकीय प्रश्नांवर आदित्य ठाकरेंचे ‘नो कॉमेंट्स’
पुणे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटे मुळे राज्यातील पर्यटन स्थळे बंद आहेत .कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागल्यामुळे राज्यात सरकार हळूहळू सगळे चालू करत आहे .तरी अजूनही पर्यटन स्थळे बंद आहेत.ते चालू करण्याबाबत पालकमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांसोबत बोलून निर्णय घेणार असल्याची माहिती पर्यटन ,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली. परंतु त्यांना विचारण्यात आलेल्या प्रत्येक राजकीय प्रश्नांवर नो कॉमेंट्स एवढेच उत्तर त्यांनी दिले.
या पत्रकार परिषदेला राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय मोरे, नगरसेवक विशाल धनवडे, व पर्यावरण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
आज आदित्य ठाकरे यांनी पुण्यात विभागीय आयुक्त येथे वसुंधरा अभियानात संदर्भात बैठक घेतली.
त्यानंतर त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कोकणातल्या बंगल्यासमोर झाडे लागली आहेत त्यावर मी फक्त पुणे येथिल कामकाजाचा आढावा घेईला आलो आहे.फक्त त्यावर बोलेल असे बोलुन आदित्य ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या बदल बोलणे टाळले .
महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज्य सरकारने तीन प्रभाग रचना हा नवा आदेश काढला आहे. त्यामुळे काही पक्ष नाराज झाले होते काही नेते कोर्टात केस दाखल करणार होते. पण मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही याचा फेरविचार करू असे सांगितले होते पण कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर काहीच निर्णय झाला नाही त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, पुण्यात प्रदूषण खूप वाढत आहे त्यावर आपण सगळीकडे झाडे लावू असे असे बोलून आदित्य ठाकरे यांनी तीन प्रभाग रचने वर बोलणे टाळले.
‘ परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या भ्रष्टाचार घोटाळाप्रकरणी त्यांची इडी ने चौकशी केली आहे त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, पुण्यात आलोय,पुण्याविषयी बोलेन’,अनिल परब हा राजकीय विषय आहे.मी मी पर्यावरण मंत्री या नात्याने या विषयावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. असे बोलून परत आदित्य ठाकरे यांनी अनिल परब यांच्या चौकशी बद्दल बोलणे टाळले.
