Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

विंटेज आणि क्लासिक ओल्ड मोटारबाईक व कार प्रदर्शनाचे पुण्यात आयोजन

पुणे : दि असोसिएशन फॉर रेसिंग अ‍ँड मोटार स्पोर्ट्स यांच्यावतीने पुण्यामध्ये दोन दिवसीय विंटेज आणि क्लासिक ओल्ड मोटारबाईक व कारचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.  शनिवार, दि. २ आणि रविवार, ३ आॅक्टोबर रोजी सकाळी १ ० ते सायंकाळी ५ यावेळेत बिबवेवाडी- कोंढवा रस्त्यावरील केंजळे बिझनेस कॉपोर्रेट सेंटर येथे प्रदर्शन होणार आहे. सन १९४७ ते १९८६ या काळातील १०० पेक्षा अधिक गाड्यांचे हे प्रदर्शन असणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश दवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष अरविंद पासलकर,  विनीत केंजळे, दि असोसिएशन फॉर रेसिंग अ‍ँड मोटार स्पोर्ट्स, आग्राचे अध्यक्ष राममोहन कपूर, शितल राठोड उपस्थित होते. प्रदर्शनात सहभागी  विंटेज बाइक संग्राहकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

कमलेश दवे म्हणाले, रुबेन सोलोमन, सॅम सोलोमन आणि विनीत केंजळे यांच्या गाड्यांचे प्रदर्शन या वेळी करण्यात येणार आहे. याशिवाय नितीन सहस्त्रबुद्धे ,श्रीनिवास ठाकूर, शेखर सौदेकर, स्वीकार राठोड, राहुल मोकाशी, संदीप कटके आणि इतर पुण्यातील संग्रहकांच्या गाड्या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत.

नॉर्टन, वेलोसेट, ट्रायम्फ, बीएसए, एरियल, रॉयल, एनफिल्ड, जावा, येझदी, राजदूत, यामाहा, वेस्पा, लॅम्ब्रेटा  आणि इतर जुन्या काळातील गाडया प्रदर्शनात असणार आहेत. दुर्मिळ, विंटेज, युद्धपूर्व, युद्धोत्तर, क्लासिक आणि भारतीय क्लासिक्स या श्रेणीमध्ये गाड्यांचे विभाजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पाश्रर््वभूमीवर बाईक्स फक्त प्रदर्शनासाठी असणार आहेत, सार्वजनिक रस्त्यावर कोणतीही राइड होणार नाही. निवडक आणि काही हौशी दिग्गजांनी ठेवलेल्या पूर्वीच्या काळातील या भव्य जुन्या गाड्या पाहण्याचे साक्षीदार होण्याची  संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading