Saturday, September 26, 2026
Latest NewsPUNE

विकास अाराखड्यात ग्राह्य धरण्याची चुक महापािलका अािण नगर िवकास विभागाने केली या याप्रकरणी चाैकशी करावी -विवेक वेलणकर

पुणे: पाटबंधारे  िवभागाच्या अभियंत्यांनी िदलेले पुररेषेचे नकाशे विकास अाराखड्यात ग्राह्य धरण्याची चुक महापािलका अािण नगर िवकास विभागाने केली अाहे. याप्रकरणी चाैकशी करावी अशी मागणी पत्रकार परीषदेत सजग नागरीक मंचचे िववेक वेलणकर यांनी केली.

या पत्रकार परिषदेला सांरग यादवाडकर, अापचे िवजय कुंभार उपस्थित होते.

विवेक वेलणकर म्हणाले, पाटबंधारे िवभागाच्या मुख्य अिभयंत्यांनी मान्य केलेल्या पुररेषांचे नकाशे गृहीत न धरता महापािलकेच्या बांधकाम िवभागाने काही बांधकामांना परवानगी िदली असल्याचा अाराेप पर्यावरण प्रेमींनी केला अाहे. त्यांनी पाटबंधारे िवभागाने मुठा, मुळा नदीच्या पुररेषांचे नकाशेे २०११ साली महापािलकेला िदले हाेते. महापािलकेने २०१३ साली िवकास अाराखडा तयार केला. या अाराखड्यात पुररेषा दाखविल्या गेल्या नव्हत्या. मार्च २०१५ साली पाट बंधारे विभागाने पुररेषांच्या नकाशांसंदर्भात एक परीपत्रक जारी करताना मुख्य अभियंत्यांनी मान्य केलेले पुररेषेचे नकाशे अधिकृत मानले जातील असे स्पष्ट केले हाेते. त्यानंतर पाटबंधारे िवभागाच्या खडकवासला िवभागातील अभियंत्याने पुररेषंाचे नकाशे तयार केले अािण ते महापािलकेला िदले.

या नकाशांमध्ये दाखविण्यात अालेल्या निळी अािण लाल रंगाच्या पुररेषांमध्ये अािण २०११ साली काढण्यात अालेल्या पुररेषाच्या नकाशामध्ये माेठ्या प्रमाणावर तफावत असुन, २०१६ साली काढलेल्या नकाशांमध्ये पुररेषा दाखविताना ती नदीच्या बाजुला सरकविली गेली अाहे. महापािलकेने सादर केलेल्या िवकास अाराखड्यातील पुररेषांच्या नकाशांना राज्याच्या नगर िवकास विभागानेच मंजुरी िदली अाहे. वास्तविक २०१६ साली काढलेले गेलेल्या नकाशांना मुख्य अिभयंत्यांची मान्यता नाही. त्यासंदर्भातील परीपत्रकाकडे महापािलका अािण नगर िवकास विभागाने दुर्लक्ष केले अाहे. यामुळे पुराचा धाेका असलेला नदीकाठचा माेठा भाग हा िवकास क्षेत्रात समाविष्ट झाला. यातुनच अाता महापालिकेने या भागातील बांधकामांना परवानगी देणे सुरू केले अाहे. ते धाेकादायक अाहे. वडगाव बुद्रुक येथे एका माेठ्या प्रकल्पाला मंजुरी िदली अाहे. या प्रकल्पाला भविष्यात पुराचा धाेका पाेहचू शकताे. याअशाप्रकारे मार्च २०१६ नंतर देण्यात अालेल्या सर्व बांधकाम परवान्यांचे पुर्नतपासणी करावी, बेकायदेशीरपणे काम करणाऱ्यांवर कारवाई करावी, पुररेषांच्या नकाशांसंदर्भातील गैरप्रकाराची चाैकशी करावी अशी मागणी उपस्थितांनी पत्रकार परीषदेत केली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading