Friday, April 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आरोग्य विभागाच्या परीक्षांची तारीख जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

मुंबई : ऐन वेळेला रद्द झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर झाल्या आहेत. ‘क’ वर्गातील पदासाठी 24 ऑक्टोबरला तर ‘ड’ वर्गातील पदांसाठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. तसेच परीक्षार्थींना परीक्षेच्या आधी 9 दिवस प्रवेशपत्र मिळणार आहे.

यापूर्वी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामार्फत घेतली जाणारी गट क आणि गट ड पदाची परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबरला  होणार होती. परंतु ऐन वेळेला परीक्षा रद्द झाल्याने परिक्षार्थिंना मनस्ताप सहन करावा लागला होता. तसेच हॉल टिकीटाच्या घोळामुळे संभ्रमावस्थेत असलेले विद्यार्थी जवळपास परीक्षाच्या ठिकाणी पोहोचले होते. या सर्व प्रकारांवर पडदा टाकत आरोग्य मंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त करीत आज परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading