Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

उत्कर्षा कदम हिची १९ वर्षाखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड

पुणे : धुळे येथे झालेल्या निवड चाचणी मधून नुकत्याच १९वर्षाखालील महाराष्ट्राचा महिला क्रिकेट संघ निवडण्यात आला. यामध्ये पुणे येथील वाॅरीअर्स‌‌‌ क्रिकेट अकादमीची महिला क्रिकेट खेळाडू उत्कर्षा कदम हिची निवड करण्यात आली. उत्कर्षा कदम ही गेल्या दोन वर्षांपासून वाॅरीअर्स क्रिकेट अकादमी मधे सराव करीत आहे. उत्कर्षा कदम हिला स्वप्निल मोडकसर. गणेश नवघणे.प्रजय पवार.तसेच महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाची सिनीयर खेळाडू सायली लोणकर हीचे मार्गदर्शन लाभले आहे. उत्कर्षा कदम हिची १९वर्षाखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल सर्व थरातून तिचे अभिनंदन करण्यात आले आणि तिच्या भविष्यातल्या कामगिरीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading