Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

Good news : राज्यातील थिएटर्स सुरु होणार, वाचा कोणत्या दिवशी?

मुंबई : शाळा, मंदिरांनंतर आता राज्यातील थिएटर्स सुद्धा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading