Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहराच्या विकासासाठी सर्वांनी सोबत येऊन काम करावे- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे :  पुणे शहराच्या विकासासाठी सर्वांनी सोबत येऊन पारदर्शकपणे काम करण्याचे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी केले. ‘अँमिनिटी स्पेस’ बाबत डेक्कन क्लब येथील सभागृहात आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. खासदार वंदना चव्हाण, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सभागृह नेते गणेश बिडकर, माजी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, नागरिकांना सुविधा देतांना विनामूल्य किंवा माफक दरातील आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. सुविधा नागरिकांच्या फायद्यासाठी असल्या पाहिजेत. शहराच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने महिला सुरक्षितता महत्त्वाचा विषय आहे. मुंबई व ठाणे शहरात ‘अँमिनिटी स्पेस’ चा वापर कशाप्रकारे झाला आहे याबाबत माहिती घेतली जाईल.

गरीब, मध्यमवर्गीय लोकांना ‘अँमिनिटी स्पेस’ कसे उपलब्ध करुन देता येईल, याचा विचार करावा. ‘कार्बन न्यूट्रल’ आराखडाबाबत कृती गटासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठक घेतली आहे, त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, अँमिनिटी स्पेस बाबत विकास आराखड्यात नियोजन केले पाहिजे. उपलब्ध जागेचे संरक्षण केले पाहिजे. नैसर्गिक आपत्तीचा विचार करता खुल्या जागा जास्तीत जास्तीत संरक्षित ठेवणे गरजेचे आहे. ‘नागरी जंगल’ ही काळाची गरज आहे. आमदार श्री शिरोळे,माजी प्रशासकीय अधिकारी श्री. झगडे, ‘सीओइपी’चे प्रा. रावळ, सभागृह नेते श्री. बिडकर यांच्यासह आदि मान्यवरांनी ‘अँमिनिटी स्पेस’ बाबत आपआपली मते मांडली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading