आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा
पुणे: महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) चा बावन्नावा स्थापना दिन साजरा करण्यात आला.यानिमित्ताने प्रा गौरी देवस्थळे यांचे ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी प्राचार्य डॉ शैला बूटवाला,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ राहुल मोरे,शबाना शेख,शिल्पा तांबे,रईसा शेख,उजमा अयुब सरखोत उपस्थित होते.आझम कॅम्पस येथे २४ सप्टेबर रोजी हा कार्यक्रम पार पडला.
