Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

संतापजनक : डोंबिवलीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, 29 पैकी 23 जणांना अटक

मुंबई : देशाला हादरवणाऱ्या साकीनाका परिसरातील अमानुष बलात्काराची घटना ताजी असतानाच मुंबई पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. डोंबिवलीतील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी मनपाडा पोलिसांनी 23 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये दोन आरोपी अल्पवयीन आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. जानेवारी 2021 पासून 22 सप्टेंबर 2021 दरम्यान वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी हा प्रकार घडला. जवळपास 8 महिन्यांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने तिच्यावर बलात्कार केला होता. आरोपीने या बलात्काराचा व्हिडीओही शूट करून पीडितेला ब्लॅकमेल करत हे अत्याचार केले. शेवटी आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने मनपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कारसह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच 23 संशयित आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींनी पीडितेला डोंबिवली, बदलापूर, मुरबाड, राबळे अशा विविध ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केला आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading