पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात नवीन कोरोनाचे 171 रुग्ण तर 105 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून दोनशे च्या खाली आज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 171नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 105रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 99हजार 959इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 89हजार 311इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 14रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 8तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 6रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9011जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1637रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 181रुग्ण गंभीर आहेत आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 8032 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
