Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांचे निधन

पुणे – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील जोशी हॅास्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हर्नियाच्या ऑपरेशन नंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर बायपास सर्जरी करण्यात आली होती. गेली चार ते पाच दिवस त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार होते. आज दुपारी त्यांचे निधन झाले.

आमदार शरद रणपिसे यांचा जन्म 14 सप्टेंबर 1951 रोजी पुण्यात झाला होता. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरवात केली. त्यानंतर त्यांनी थेट विधान परिषद गाठली. पुढे त्यांचा प्रवास विधान परिषद आमदार ते विधिमंडळातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असा राहिला. विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते म्हणून देखील त्यांनी काम केले.

रणपिसे हे 1979-85 या कालावधीत पुणे महापालिकेचे नगरसेवक, तर त्यानंतर 1983-84 ला गलिच्छ वस्ती निर्मूलन, गृहनिर्माण आणि समाज कल्याण समितीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर 1994-95 मध्ये ते उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, पुणे चे सदस्य होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading