Friday, May 29, 2026
BusinessLatest NewsTECHNOLOGY

ऑडी इंडियाने भारतातील पहिली इलेक्ट्रिक सुपरकार केली लॉंच

जर्मन लक्झरी कार निर्माता ऑडीने आज भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीत फोर-डोर कूप्स-ऑडी ईट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ईट्रॉन जीटी या दोन पूर्णपणे इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या. ऑडी ई-ट्रॉन जीटी पूर्ण पणे नवी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार असून ती स्पोर्टीनेस, एक्सक्लूझिविटी आणि आराम प्रदान करते. ऑडी आरएस ई ट्रॉन जीटी कोणत्याही इतर आरएस पेक्षा वेगळी आहे. हे ऑडीचे आतापर्यंतचे सर्वात पावरफुल सीरीज उत्पादन आहे.

ऑडी ई-ट्रॉन जीटी मध्ये ३९० किलोवॅटची पॉवर आहे आणि ती ४.१ सेकंदात ताशी ०-१०० किमीचा सुपरफास्ट वेग धारण करते. तर ४७५ किलोवॅट आरएस ई-ट्रॉन जीटी केवळ ३.३ सेकंदात हा वेग धारण करते. ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी ई-ट्रॉन जीटी मध्ये ८३.७/९३. ४ केडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरी आहे. ती ऑडीआरएस ई-ट्रॉन जीटी साठी ४०१-४८१  किमी आणि ऑडी ई-ट्रॉन जीटी (डब्ल्यूएलटीपी कम्पाइंड) साठी ३८८-५०० किमीची रेंज प्रदान करते. २७० किलोवॅट डीसी चार्जिंग पॉवर आणि ८०० व्होल्ट तंत्रज्ञानासह नेक्स्ट लेवल हाय पॉवर चार्जिंग, सुमारे २२ मिनिटात ५% ते ८०% पर्यंत चार्ज होते. ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि आरएस ई – ट्रॉन जीटी अनुक्रमे १,७९,९०,००० आणि २,०४,९९,००० रुपयांत (एक्स-शोरूम) भारतीय बाजारात उपलब्ध आहे.

ऑडी व्हर्चुअल कॉकपिट आणि एमएमआय टच ३१.२४ सेमी (१२.3″) आणि २५.६५ सेमी (१०.१”) च्या डिस्प्लेसह स्टँडर्ड रुपात येतात. ऑडी आरएस ईट्रॉन जीटी वर मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स स्टँडर्डच्या रुपात येते. तर ऑडी ई-ट्रॉन जीटी वर एलईडी हेडलाइट्स स्टँडर्ड आहेत. ऑडी लेजर लाइटसह मॅट्रिक्स एलईडी हेडलँप दोन्ही कारवर एक पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. या दोन्ही कार लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टिम आणि क्रूज कंट्रोलसह येतात तसेच यामध्ये ३६० डिग्री कॅमेऱ्यांसह पार्क असिस्ट प्लस पॅकेज वैकल्पिक रुपात उपलब्ध आहे. या कार्स पॅनोरमिक ग्लास रुफने सुसज्ज असून कार्बन रुपात अपग्रेड करता येतात. या दोन्ही कार आयबिस व्हाइट, एस्कारी ब्लू, डेटोना ग्रे, फअलोरेट सिल्व्हर, केमोरा ग्रे, माइतोस ब्लॅक, सुजुका ग्रे, टॅक्टिक्स ग्रीन आणि टँगो रेड या नऊ रंगात उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading