वंचित चा संघटन समीक्षा व संवाद मेळावा बुधवारी
पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी.व महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष सविता मुंडे यांचा दौरा दिनांक 22/09/2021 वार बुधवार रोजी सकाळी ११:०० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जान मोहम्मद स्ट्रीट भीमपुरा कॅम्प -पुणे01 या ठिकाणी होणार असून पुणे शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी पदाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की सदर कार्यक्रम संघटन समिक्षा व संवाद मेळावा* यासाठी पुणे शहर कार्यकारिणी व विधानसभा कार्यकारिणी महिला आघाडी कार्यकारणी सर्व वंचित बहुजन आघाडी,महिला आघाडी,युवा आघाडी, बाळासाहेब आंबेडकरांवर निष्ठा असलेले सर्वच पदावर असलेले नसलेले कार्यकर्ते यांच्या साठी महत्वाची असून वंचित बहुजन आघाडी व श्रध्देय प्रकाश आंबेडकर साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष मुनव्वर कुरेशी यांनी केले आहे.
