Friday, May 29, 2026
Latest NewsSports

एचपी महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एचपी रॉयल्स संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे : हेमंत पाटील(एचपी) प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित एचपी महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पूनम खेमनार(82धावा) हिने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर एचपी रॉयल्स संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा 8 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
शाहू कॉलेज क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्यांदा खेळताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 20 षटकात 3बाद 124धावा केल्या. यात कश्मिरा शिंदे 39, साक्षी डोंगरे नाबाद 38, मानसी तिवारी 23 यांनी धावा केल्या. एचपी रॉयल्स कडून प्रज्ञा वीरकर(1-7), तनुजा भोसले(1-15) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. हे आव्हान एचपी रॉयल्स संघाने 14.3षटकात 2बाद 125धावा करून पूर्ण केले. यात पूनम खेमनारने अफलातून फलंदाजी करत 41 चेंडूत 11चौकार व 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 82 धावांची खेळी करून संघाचा विजय सुकर केला. पूनमला वैष्णवी शिंदे 19, सायली लोणकर 14 यांनी धावा काढून साथ दिली. सामन्याची मानकरी पूनम खेमनार ठरली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 20 षटकात 3बाद 124धावा(कश्मिरा शिंदे 39(28,4×4), साक्षी डोंगरे नाबाद 38(44,5×4), मानसी तिवारी 23, प्रज्ञा वीरकर 1-7, तनुजा भोसले 1-15)पराभूत वि.एचपी रॉयल्स: 14.3षटकात 2बाद 125धावा(पूनम खेमनार नाबाद 82(41,11×4,4×6), वैष्णवी शिंदे 19, सायली लोणकर 14, अनन्या दर्शळे 1-14,मनाली जाधव 1-23);सामनावीर-पूनम खेमनार; एचपी रॉयल्स संघ 8 गडी राखून विजयी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading