ललित कला केंद्र आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनय प्रमाणपत्र वर्ग
पुणे:नाटक, संगीत, नृत्य आणि दृश्यकला या क्षेत्रांत काम करणारी पुण्यातील अग्रगण्य संस्था – ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’ आणि ‘ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभिनय प्रमाणपत्र वर्ग’ (सर्टिफिकिट कोर्स इन ऍक्टिंग’ सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत डॉ. प्रवीण भोळे विभाग प्रमुख ,ललित कला केंद्र गुरुकुल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला शुभांगी दामले,अपूर्व साठे उपस्थित होते. अभिनय प्रमाणपत्र वर्ग’ची पहिली बॅच दि. १५ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरू होणार असून प्रवेशप्रक्रिया चालू झाली आहे. कोर्स करण्याची इच्छा असलेल्यांसाठी दि. ०३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता ‘ज्योत्स्ना भोळे सभागृह, पुणे’ येथे मोफत ओरिएंटेशन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नाटककार आणि ललित कला केंद्राचे माजी विभागप्रमुख सतीश आळेकर यावेळी उपस्थितांशी संवाद साधतील.
डॉ. प्रवीण भोळे म्हणाले,या कोर्समधे महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या प्रशिक्षकांबरोबरच विविध मान्यवर रंगकर्मींची सत्रेही आयोजित केली जाणार आहेत. एकूण ४५ सत्रांच्या या अभ्यासक्रमाचा शेवट विद्यार्थ्यांच्या विविध सादरीकरणांच्या मूल्यमापनाने होईल व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे’ प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.अशी माहिती भोळे यांनी दिली.
