थलापती विजयने स्वतःच्याच पालकांविरोधात दाखल केला खटला, वाचा नेमक प्रकरण काय आहे?
अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay) म्हणजे दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील मोठा सुपरस्टार. विजयने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात केली. वयाच्या 18 व्या वर्षी त्याने ‘नलय थेरपू’ हा चित्रपट केला होता. यामध्ये विजयने मुख्य भूमिका साकारली होती. ‘मास्टर’, ‘सरकार’, ‘थुपाक्की’, ‘जिल्हा’, ‘बीस्ट’ हे त्याचे काही गाजलेले चित्रपट. त्याचे हटके संवाद, अभिनय आणि लक्झरीयस गाडयांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. विजयने स्वतःच्याच पालकांविरोधात मद्रास उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.
नेमक प्रकरण काय आहे?
विजयचे वडील सुरेश चंद्रशेखर यांनी ‘अखिल भारतीय थालापती विजय मक्कल इयक्ककम’ हा राजकीय पक्ष काही दिवसांपूर्वी सुरू केला आहे. या पक्षाच्या सरचिटणीसपदी विजयचे वडील आसून त्याची आई शोभा चंद्रशेखर या पक्षाच्या कोषाध्यक्ष आहेत. या पार्श्वभूमीवर विजयने एक निवेदन काढून त्यात म्हटले होते की, ‘त्याचा या निवडणूक पक्षाशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणीही माझे नाव पाहून या पक्षात सामील होवू नये’, असे आवाहन केले होते. तसेच ‘जर कोणताही राजकीय पक्ष त्याचा फोटो किंवा फॅन क्लब वापरत असेल, तर तो त्यांच्यावर गुन्हा दाखल करेल’, असेही म्हटंले होते. त्यानुसारच सदर खटला मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. विजयनच्या पालकांसह आणखी अकरा जणांविरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहे.
