ओबीसींचा खरा चेहरा डॉ.तायवाडे-चेतन शिंदे.
पुणे: आज सर्व भारत भर ओबीसी समाजावर होत असलेल्या शासनच्या अन्यायकारक नियमांच्या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून काम करणारे डॉ. बबनराव तायवाडे यांनी आज त्याची खरी प्रचिती दिली आहे. डॉ. बबनराव तायवाडे हे ओबीसी समाजाचा खरा चेहरा असल्याचे मत चेतन शिंदे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक बुलढाणा येथे पार पडली तेव्हा त्यांनी आपले विचार मांडले.
चेतन शिंदे म्हणाले, आज सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करत असतांना वेग-वेगळ्या समाज संघटना व समाज नेते आपण बघत असतो. आपल्या स्वार्थासाठी आपला समाज ,संघटना एखाद्या पक्षाच्या किंवा नेत्याच्या दावणीला बांधलेले आपण सर्वच बघत असतो परंतु जेव्हापासून राज्य मागासवर्गीय आयोगावर डॉ.तायवाडे यांची नियुक्ती झाली तेव्हा पासून त्यांनी सर्व शासकीय यंत्रणेचा वापर आपल्या ओबीसी समाज हितासाठी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
त्यांच्या जेव्हा लक्षात आले की आपण आपले आयोग, आपले प्रयत्न करून शासन दरबारात त्याला वाव नसेल तर या पदावर राहुन आपला काय उपयोग? ओबीसी समाजाने आपल्याला या पदावर ज्या उद्देशाने पाठवले तो उद्देश जर पूर्ण होत नसेल आणि आपण आपल्या पदाला योग्य न्याय देऊ शकत नसेल तर त्या पदावर राहून ओबीसी समाजाचा काय फायदा? या सारख्या अनेक प्रश्नांना वाचा फोडत शेवटी त्यांनी ओबीसी हितासाठी राजीनामा दिला. सामाजिक जीवनात अनेक नेते ओबीसी च्या लढाईत कुणी आमदार तर कुणी मंत्री होतांना आपण बघितले आहे परंतु ओबीसी च्या हक्कासाठी राजीनामा देणारा नेता मी आज पर्यंत बघितला नव्हता तो डॉ.तायवाडे यांच्या रूपाने बघितला .
