Wednesday, November 18, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

माजी केंद्रीय मंत्री, भाजप नेते बाबुल सुप्रियो यांचा तृणमूलमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री रहिलेले खासदार बाबुल सुप्रियो यांनी तृणमुल काँग्रेसमध्ये (TMC ) प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी बाबुल सुप्रियो यांनी भाजपला राजीनामा दिला होता. आज तृणमूल महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि खासदार डेरेक ओ ब्रायन  यांच्या उपस्थितीत सुप्रियो यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. 

बाबुल सप्रियो यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर टीएमसीकडून आपले निवेदन जारी केले आहे. टीएमसीने सांगितले की, राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि राज्यसभेचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या उपस्थित माजी केंद्रीय मंत्री आणि सध्याचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. यानिमित्ताने आम्ही त्यांचे स्वागत करतो.टीएमसीमध्ये प्रवेश केल्यानंतर सुप्रियो म्हणाले की, ‘ते आसमसोलचे खासदारपदही सोडतील. सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतील.’

दरम्यान सुप्रियो यांचा सुरक्षा दर्जेतही आज बदल करण्यात आला आहे. बाबुल सुप्रियो यांच्या Z दर्जाच्या सुरक्षेऐवजी Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्राकडून बाबुल सुप्रियो यांना सुरक्षा दिली होती. आता सुप्रियो यांनी सीआरपीएफची सुरक्षा मिळाली आहे.

सुप्रियो यांनी टीएमसीमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर पक्षाचे नेते कुणाल घोष म्हणाले की, भाजपचे काही नेते टीएमसीच्या संपर्कात आहेत. भाजपात ते समाधानी नाही आहेत. आज भाजपच्या एका नेत्याने टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. इतर नेतेही टीएमसीमध्ये येऊ इच्छित आहे. ही प्रक्रिया सुरू राहिलं. प्रतिक्षा करा आणि पाहत राहा.

Leave a Reply