पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दगडूशेठ ट्रस्टच्या व्हर्च्युअल माध्यम सुविधेचे कौतुक

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ऑनलाईन माध्यमांच्या सुविधांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

यंदा ट्रस्टने ऑगमेंटेड रिअॅलिटी या तंत्रज्ञानाद्वारे देखील गणेशभक्तांना घरबसल्या आरतीची सुविधा करून दिली आहे. त्यामुळे अशा सर्वच ऑनलाईन सुविधांचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून शुभेच्छा संदेशाचे पत्र ट्रस्टला पाठवले आहे. गणेशभक्तांना घर बसल्या व्हर्च्युअल माध्यमांद्वारे गणेशाचे दर्शन व आरतीची सुविधा करुन दिल्याबद्दल मोदी यांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: