एचपी महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत जनादेश इंडिया संघाची शानदार सुरुवात

पुणे : हेमंत पाटील (एचपी) प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित एचपी महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत भारतीय महिला क्रिकेटपटू देविका वैद्य(3-6)हिने केलेल्या भेदक गोलंदाजीसह तेजल हसबनीस(2-14 व 35धावा) हिने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर जनादेश इंडिया संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा 4 गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली.
शाहू कॉलेज क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या लढतीत जनादेश इंडिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जनादेश इंडियाच्या देविका वैद्य(3-6), तेजल हसबनीस(2-14), किरण नवगिरे(1-9), सई चव्हाण(1-21), रोहिणी मोरे(1-22) यांच्या भेदक गोलंदाजी पुढे व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा डाव 20षटकात 8बाद 83धावावर संपुष्टात आला. यात शिवाली शिंदे 22, आरती बेहेनवाल 16 यांनी थोडासा प्रतिकार केला.
याच्या उत्तरात जनादेश इंडिया संघाने हे आव्हान 19.5षटकात 6बाद 84धावा करून पूर्ण केले. सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे संघ 7.1 षटकात 3बाद 29 असा अडचणीत असताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आलेली संघाची कर्णधार तेजल हसबनीसने संयमपूर्ण फलंदाजी करत 39 चेंडूत 4चौकारांच्या मदतीने 35 धावांची महत्वपूर्ण खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तेजलला सानिया पावगी 11, ऋतुजा गिलबिले 8 यांनी धावा काढून साथ दिली. व्हेरॉक संघाकडून उत्कर्षा पवार(1-10), श्रद्धा पोखरकर(1-18), अनन्या दर्शळे(1-16), आरती बेहेनवाल(1-11) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. अष्टपैलू कामगिरी करणारी तेजल हसबनीस सामनावीर ठरली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 20षटकात 8बाद 83धावा(शिवाली शिंदे 22(22,3×4), आरती बेहेनवाल 16, श्रद्धा पोखरकर 15, देविका वैद्य 3-6, तेजल हसबनीस 2-14, किरण नवगिरे 1-9, सई चव्हाण 1-21, रोहिणी मोरे 1-22) पराभूत वि.जनादेश इंडिया: 19.5षटकात 6बाद 84धावा(तेजल हसबनीस 35(39,4×4), सानिया पावगी 11, ऋतुजा गिलबिले 8, उत्कर्षा पवार 1-10, श्रद्धा पोखरकर 1-18, अनन्या दर्शळे 1-16, आरती बेहेनवाल 1-11);सामनावीर-तेजल हसबनीस; जनादेश इंडिया संघ 4 गडी राखून विजयी.

Leave a Reply

%d bloggers like this: