Wednesday, June 17, 2026
Latest NewsSports

अलीना शेखला राष्ट्रिय टेनिस स्पर्धेमध्ये उपविजेतेपद

पुणे : पुण्याची राष्ट्रिय खेळाडू अलीना शेख हिने ६ ते १० सप्टेंबर २०२१ या दरम्यान अहमदाबाद, गुजरात येथे पार पडलेल्या अल्टेवोल- अॅलेक्झॅन्डर वास्क टेनिस युनिव्हर्सिटीव्दारा आयोजित अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेमध्ये १६वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटामध्ये राजस्थानच्या प्रगती वैष्णव हिच्या साथीमध्ये खेळून उपविजेतेपद पटकाविले.

अंतिम सामन्यामध्ये जेनिका जैसन व डॅनिका फर्नांडो या जोडीने त्यांचा ६-४, ६-३ असा पराभव केला. यापुर्वी झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यामध्ये अलिना/प्रगतीच्या जोडीने जान्हवी असावा / क्रिष्ना दलाल या जोडीचा ६-३,६-२ असा पराभव केला तर उपांत्यपूर्व फेरीमध्ये साक्षी व सायली ठक्कर या प्रथम मानांकित जोडीचा ७-५,३-६,१०-८ असा पराभव केला.

महाराष्ट्र कॉस्मोपोलीटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार तसेच आझम स्पोर्टस् अॅकेडमीचे संचालक गुलजार शेख यांनी अलिना शेख हिचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading