मोठ बातमी – देशात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट उधळला, सहा संशयित दहशतवाद्यांना अटक 

मुंबई : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने देशात बॉम्बस्फोट घडवण्याचा मोठा कट उधळून लावला. पोलिसांनी एकूण सहा संशय़ित दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांचा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच दिल्लीत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट होता. यातील दोघांना दिल्ली येथून तर राजस्थान व उत्तर प्रदेश येथून चौघांना अटक करण्यात आली आहे. यातील दोन संशयित दहशतवादी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये मुंबईत राहणाऱ्या एकाचा समावेश आहे.

मिळेलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आलेले आरोपी ISI च्या देखरेखीखाली भारतात मोठा बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत होते. त्यासाठी सदर आरोपी शस्त्रास्त्रे तसेच दारुगोळा जमवत होते. मात्र, या घातपातची माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला तसेच एटीएसला समजली. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या एटीएससोबत उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये छापेमारी केली. तसेच येथे तीन संशयित आरोपींना पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दारुगोळा तसेच शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आले आहेत.

मुंबईतील संशयित दहशतवाद्याचे कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात 

अटक केलेल्यांपैकी दहशतवाद्यामध्ये एक जण मुंबईतील सायन परीसरात राहत होता. जान मोहम्मद शेख असे त्याचे नाव आहे. त्याला दिल्ली पोलिसांनी राजस्थानच्या कोटामधून अटक केलीय. शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जात होता. समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख हा दाऊदचा भाऊ अनिस याच्याही संपर्कात होता, अशी माहिती सुत्रांनी दिली.  जान मोहम्मद शेखला अटक झाल्या नंतर मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस जान शेखच्या घरी पोहोचले. तसेच पोलिसांनी घराची तपासणी करुन त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. सध्या जान शेखचे कुटुंबीय धारावी पोलीस ठाण्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे.

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: