‘सामाजिक सुरक्षा,न्याय व्यवस्था आणि क्षेत्रसभा’विषयावरील चर्चासत्राला प्रतिसाद

पुणे : इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप,क्षेत्रसभा समर्थन मंच पुणे आणि जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय यांच्यातर्फे’सामाजिक सुरक्षा,न्याय व्यवस्था आणि क्षेत्रसभा’विषयावर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

सरदार पाटील (वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलिस स्टेशन),अँड.संतोष म्हस्के (वरिष्ठ वकील,शिवाजीनगर कोर्ट पुणे),वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे हे या चर्चासत्रात सहभागी झाले.१३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता हे चर्चासत्र पार पडले.असलम इसाक बागवान(इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप)यांनी सूत्रसंचालन केले.

एड.अल्लाउद्दीन शेख यांनी संयोजन केले.सरदार पाटील म्हणाले,’समाजाला जागरूक नागरिकांचे योगदान आवश्यक असते.सामाजिक सुरक्षा संभाळण्यासाठी पोलिसांनी सर्व गोष्टी कराव्यात असे मानणे योग्य नाही,समाजाच्या सामाजिक जाणिवा देखील वाढल्या पाहिजेत.पोलिसांची गरजच न लागणारा समाज चांगला मानता येईल.वाहतूक पोलीस असेल तरच ट्रॅफिक सिग्नल पाळणार,पोलीस असतील तरच आपण कायदा पाळणार का ?सामाजिक सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी आहे.आपण पुढील पिढीला कायदेपालनाचा आदर्श दिला पाहिजे.नियमपालन केले पाहिजे.आपले शहर चांगले आणि सुरक्षित राखणे यासाठी सर्वांच्याच प्रयत्नांची गरज आहे.’

एड.संतोष म्हस्के म्हणाले,’सामाजिक सुरक्षा राखण्यासाठी नागरिकांनी आपले हक्क आणि कर्तव्ये समजून घेतले पाहिजेत.पोलिसांच्या उपलब्ध मनुष्यबळाचाही आपण विचार केला पाहिजे.महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि त्यातील कलमे नागरिकांनीही वाचली पाहिजेत.सामाजिक न्याय मिळण्यासाठी सरकारी यंत्रणा,विधी साहाय्य समिती,आपत्ती व्यवस्थापन समिती,लोकन्यायालय आणि न्याय यंत्रणांची माहिती नागरिकांनी घेतली पाहिजे.

Leave a Reply

%d bloggers like this: