उद्या राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता

पुणे: मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसगारात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. तर मराठवाडा आणि घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. बंगलाच्या उपसागरात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आज आणखी तीव्र झालं आहे. त्यामुळे उद्या राज्यात तीन जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागानं उद्या राज्यात मुंबईसह, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर या नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे येत्या चोवीस तासांत संबंधित जिल्ह्यात वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज अवघे तीन जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. मध्य महाराष्ट्र, खानदेश, उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उद्या कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. उद्याही राज्यात पावसाची स्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच राहण्याची शक्यता आहे. पण बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र उद्यापासून उत्तरेकडे सरकेल. त्याचा परिणाम म्हणून राज्यात उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार आहे. पण आज राज्यभर पावसाचा तुफान हजेरी लागणार आहे. तर कोकणात आणि घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोमवारी (ता. 13) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्त्रोत : हवामान विभाग) :
कोकण :
पालघर : मोखेडा 90, तलासरी 89, वाडा 78,
रायगड : कर्जत 90, खालापूर 89, माथेरान 240, पनवेल 78, पेण 89, पोलादपूर 90.
सिंधुदुर्ग : दोडामार्ग 90, कणकवली 34, सावंतवाडी 78.
ठाणे : आंबरनाथ 67, कल्याण 98, शहापूर 90, ठाणे 41, उल्हासनगर 89.

मध्य महाराष्ट्र :
जळगाव : बोधवड 90.
कोल्हापूर : गगणबावडा 58.
नाशिक : हर्सूल 46, इगतपुरी 78, नाशिक 89, ओझरखेडा 89, पेठ 78, त्र्यंबकेश्वर 90.
पुणे : लोणावळा कृषी 89.
सातारा : महाबळेश्वर 201.

विदर्भ :
गडचिरोली : धानोरा 40.
गोंदिया : आमगाव 89, देवरी 90, गोंदिया 78, गोरेगाव 67, सालकेसा 65.

Leave a Reply

%d bloggers like this: