गौरव घुले यांच्या संकल्पनेतून गणपती विसर्जन हौद आपल्या दारी

पुणे:  यंदा  कोरोनाचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही महानगरपालिकेने बाप्पा आता आपल्या घरीच  विसर्जन करावे अश्या सूचना दिल्या आहेत . त्यानुसार बिबवेवाडी भागातील युवा नेतृत्व गौरव घुले यांच्या संकल्पनेतून गणपती विसर्जन हौद आपल्या दारी उपक्रम चालू केला आहे. गणपती विसर्जन हौद तिसरा,पाचवा,सातवा,नववा व दहाव्या दिवशी येईल असे गौरव घुले यांनी सांगितले. गौरव घुले म्हणाले, गणपती कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चालू वर्षी शासनाने दिलेल्या सूचना नुसार नागरिकांचा वेळ वाचावा. व त्यांची गैरसोय होऊ नये .म्हणून फिरता गणपती विसर्जन हौद ची आपल्या भागात सोय केली आहे. तरी नागरिकांनी आपल्या घरातील गणपतीचे फिरत्या विसर्जन हौदामध्ये गणपती विसर्जन करून सहकार्य करावे, ही विनंती
  

Leave a Reply

%d bloggers like this: