पुणे – गेल्या 24 तासात 134 नवीन कोरोनाचे रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून आज दिडशे च्या आत रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 134 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 287रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 97हजार 987 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 86हजार 947इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 4रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 2तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8973 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 2067 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 215 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 6879 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: