fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात मंडईच्या शारदा गजाननाची प्राणप्रतिष्ठापना संपन्न

पुणे : आपला गणपती शारदा गणपती…गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन मंदिरात विराजमान झाले. चैतन्यमय वातावरणात दुपारी १२ वाजता श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि मीना भोंडवे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली. अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १२८ वे वर्ष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदादेखील साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येत आहे. सूर्य या संकल्पनेवर आधारीत आकर्षक फुलांची आरास मंदिरात करण्यात आली आहे.

अविनाश कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. यावेळी यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात,उपाध्यक्ष मिलिंद काची, कार्याध्यक्ष अभय थोरात, खजिनदार संजय मते, सचिव विश्वास भोर, विश्वस्त देविदास बहिरट, सुरज थोरात, विक्रम खन्ना, संकेत मते, अजय झवेरी, संकेत तापकीर, साहिल मिसाळ, अथर्व माने, ओमकार थोरात, आशीष थोरात, हर्षल भोर आदी उपस्थित होते.

अण्णा थोरात म्हणाले, उत्सवकाळात २४ तास आॅनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंडळाच्या https://akhilmandaimandal.org/ या वेबसाईट वरुन शारदा गजाननाचे दर्शन घेता येणार आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आॅनलाईन पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी ६ वाजल्यापासून प्रात:पूजा, आरती, गणेशयाग,सायंपूजा आणि संध्याकाळी ७.३० वाजता महाआरती होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे सर्व शासकीय नियमांचे पालन करुन पुढील 10 दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मंडळाच्या वतीने लसीकरण मोहिम देखील राबविण्यात येत आहे. यासोबतच प्रत्येक २ तासांनी फॉग मशीनच्या सहाय्याने पूर्ण मंदिर सॅनिटाईज केले जाणार आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading