व्होल्टास आणि व्होल्टास बेकोतर्फे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने विशेष ऑफर्सची घोषणा

मुंबई : भारतात एअर कंडिशनर्सच्या बाजारपेठेतील निर्विवाद मार्केट लीडर व्होल्टास लिमिटेडने महाराष्ट्रातील आपल्या ग्राहकांसाठी विशेष गणेश चतुर्थी सेलिब्रेशन ऑफर्सची घोषणा केली आहे.

यंदा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ग्राहकांना आपली मनपसंद खरेदी सहजपणे करता यावी म्हणून या ब्रॅंडने कॅशबॅक ऑफर्स, पाच वर्षांपर्यंतची सर्वसमावेशक वॉरंटी आणि इझी ईएमआय योजना यांचा मिलाप असलेल्या विशेष ऑफर्सची घोषणा केली आहे.  ग्राहकांना सर्वोत्तम सेवा व उत्पादने पुरवता यावीत आणि त्यांची सर्व उत्पादने जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने ग्राहकांना उपलब्ध व्हावीत यासाठी व्होल्टास लिमिटेडने वेगवेगळ्या फायनान्स ऑफर्स सुरु केल्या आहेत, यामध्ये निवडक क्रेडिट कार्ड्सवर १५% पर्यंत कॅशबॅक आणि एनबीएफसीज् मार्फत इझी ईएमआय फायनान्स ऑफर यासारख्या विविध योजनांचा समावेश आहे. या ऑफर्समुळे ग्राहकांना व्होल्टास व व्होल्टास बेको उत्पादनांच्या खरेदीवर लाभ मिळवण्याची संधी मिळेल. उत्पादन आणि खरेदी केलेल्या मॉडेलच्या आधारे ऑफरचे मूल्य विचारात घेतले जाईल. १ सप्टेंबर २०२१ पासून या ऑफरची सुरुवात झाली असून ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत त्यांचा लाभ घेता येईल.

व्होल्टास लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रदीप बक्षी यांनी सांगितले, “यंदाची गणेश चतुर्थी देखील जरी आपल्याला आपल्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसोबत साजरी करावी लागणार असली तरी हा सण नवी आशा व नवा उत्साह घेऊन येत आहे.  हा काळ सर्वांसाठी सुखसमृद्धी घेऊन येणारा ठरो ही आमची शुभेच्छा आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातील या सर्वात मोठ्या उत्सवाचा आनंद आम्ही आमच्या आकर्षक ऑफर्समार्फत द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत आहोत.  या ऑफर्सचा लाभ घेऊन ग्राहकांना त्यांच्या घरामध्ये सुधारणा घडवून आणण्यात मदत मिळेल आणि तसे करत असताना भरपूर बचत देखील करता येईल.  ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत नेतृत्वस्थानी असलेली कंपनी या नात्याने आमच्या ग्राहकांच्या विशेष गरजा ओळखून त्यानुसार तयार करण्यात आलेल्या नवनवीन ऑफर्स आणि सेवा सातत्याने सादर करत राहू.”

Leave a Reply

%d bloggers like this: