ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांचे पितळ उघडे पडणार -किरीट सोमय्या

पुणे: मी ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याचा घोटाळा बाहेर काढून ठाकरे सरकारचे पितळ उघडे पडणार आहे. असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला केला.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते. सोमय्या म्हणाले, सातारा कोरेगाव येथील जरंडेश्वर कारखाना विरोधकांनी 65 कोटीत विकत घेतला आणि कर्ज 700 कोटी घेतले याला कर्ज फक्त 100 कोटी मिळू शकते. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये घोटाळा झाला होता त्यावर पण आज त्यांनी भाष्य केले.पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही तर लीड बँक आहे.

कितीही घोटाळा झाला . तरी महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणार असाही किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकार वर आरोप केला. बजरंग खरमाटे यांच्या चाळीस ठिकाणची माहिती काढली असून त्याची आठ तास चौकशी झाली आहे येणाऱ्या दोन ते तीन आठवड्यात पहिली अकॅशन येईल असेही ते म्हणाले.

अनिल देशमुख व बजरंग खरमाटे  यांची सर्व माहीती बाहेर येईल.असेही ते म्हणाले. शरद पवार भावना गवळी यांना निर्दोष सिद्ध करतात व ईडी सूडबुद्धीने काम करते असा आरोप करतात परंतु भावना गवळी यांची बँक  चौकशी करावी अशीही त्यांनी मागणी केली. बालाजी सहकारी कारखाना यामध्ये मोठी रक्कम भावना गवळीची असून राज्यसरकार व केंद्रसरकारचा पैसा बुडवला.असाही आरोप त्यांनी भावना गवळी यांच्यावर केला. शरद पवार हे सरकारला असल्या बाबींना पाठिंबा देतात काय असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारला .शरद पवार यांना भावना गवळीला वाचवायच आहे काय असा ही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Leave a Reply

%d bloggers like this: