Pune Crime – रिक्षा चालकाचा 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

पुणे : अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेतून पुणे सावरले नसतानाच गुरुवारी पहाटे आणखी एक संतापजनक प्रकार पुणे शहरात घडला. एका रिक्षा चालकाने 6 वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तीच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी काही तासातच आरोपींला जेरबंद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पुणे स्टेशन बस स्थानकालगत पिडीत मुलीचे कुटूंब रहाते. पहाटे पिडीत मुलगी आईच्या कुशित झोपली असताना, आरोपी रिक्षाचालकाने तीला उचलून रिक्षात ठेवले. यानंतर रिक्षा थेट मार्केटयार्ड येथील एका पडीत इमारतीजवळ नेली. तेथे इमारतीच्या वरच्या मजल्यावर तीला नेऊन बलात्कार केला.

दरम्यान, घरच्यांना जाग आल्यावर मुलगी कुशीत नसल्याचे दिसले. त्यांनी सुरवातीला आजूबाजूला शोध घेतला. मात्र ती मिळून न आल्याने त्यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनीही नुकत्याच घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर परिसर पिंजून काढला तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत काढत त्याला मार्केटयार्ड परिसरात जेरबंद केले. यानंतर पिडीत मुलीला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले

 या घटनेसंदर्भात बोलताना यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन, यांनी सांगितले की, “तक्रार प्राप्त होताच, पोलिसांची पथके मुलीच्या शोधासाठी रवाना झाली. तांत्रीक विश्‍लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढून त्याला अटक करण्यात आली. आरोपीचे आडनाव मांढरे असे आहे” 

Leave a Reply

%d bloggers like this: