जाधवर नर्सिंग कॉलेजतर्फे स्तनपानाविषयी जनजागृती व मार्गदर्शन

खडकवासला भागातील महिलांना नर्सिंगच्या विद्यार्थीनींनी केले मार्गदर्शन

पुणे : जाधवर इन्स्टिट्युट आॅफ नर्सिंग कॉलेज च्यावतीने विशेष उपक्रम राबविण्यात आला. खडकवासला भागातील महिलांना स्तनपानाविषयी मार्गदर्शन करण्याकरीता नर्सिंगच्या विद्यार्थीनींनी पुढाकार घेतला. यावेळी नवजात बालकाला स्तनपान करण्याचे फायदे तसेच माता कोविड संक्रमित असेल, तर कशा पध्दतीने काळजी घेऊन स्तनपान करावे, याविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

 प्राचार्या शीतल निकम व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी खडकवासला येथे कार्यक्रम राबविला. खडकवासला येथील मेडिकल आॅफिसर डॉ. वंदना गवळी व डॉ. शब्दा शिरपूरकर तसेच सुपरवायझर भिसे, सिस्टर तांबोळी, सिस्टर मदने, सिस्टर जाधव, व सर्व आशा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: