पूजा चव्हाण प्रकरणातही असाच तपास पुणे पोलिसांनी का केला नाही – चित्रा वाघ यांचा सवाल

पुणे: भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरण संदर्भात माहिती घेतली पुणे पोलिसांनी या प्रकरणात योग्य तपास केला असून पुणे पोलिसांचे चित्रा वाघ यांनी कौतुक केलं तर पूजा चव्हाण च्या प्रकरणातही असाच तपास पुणे पोलिसांनी का केला नाही असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला .पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन आल्यानंतर त्यांनी याबद्दल पत्रकारांशी संवाद साधला.

करुणा शर्मा प्रकरणावर पण चित्रा वाघ यांनी भाष्य केले त्या म्हणाल्या बीडमध्ये सध्या गुंडाराज चालू आहे पोलिसांनी जी कारवाई केली ती कोणत्या आधारे गेली याची माहिती पोलिसांनी देणे गरजेचे आहे सत्तेचा गैरवापर करुणा शर्मा बाबतीत झाला असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

पुण्यातील कदमवाकवस्ती या ठिकाणी सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाली त्याबाबत वेगवेगळे खुलासे सध्या केले जात आहेत या विषयी बोलताना वाघ म्हणाल्या, पूर्ण सीसीटीव्ही देऊन या प्रकरणाची चौकशी करावी जर एखादा पुरुष महिलेला मारहाण करत असेल तर महिला गप्प बसणार नाही आणि कदमवाकवस्ती या ठिकाणचं लसीकरण केंद्र का बंद केलं गेलं याचे उत्तर अजित पवारांनी द्या व अजित पवार यांचं काम करण्याची पद्धत पूर्णतः मला माहित आहे त्यामुळे दादांनी या प्रकरणात लक्ष घाला व यात कुठलाही राजकारण केलं गेलं नाही किंवा गौरी गायकवाड ही भाजपची ही नाही असाही टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला

रामदास तडस प्रकरणावर त्यांनी भाष्य केले त्या
पूजा तडस तिच्याबरोबर माझं फोनवरती बोलणं झालेलं आहे पूजा चा संसार वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तडस यांचा हा घरगुती वाद आहे तो समोर आला कसा यात कुठलेही राजकारण केलं जातं नाही. असे चित्र वाघ म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: