हुंडईने लॉंच केले अत्याधुनिक HX380 L

चाकण : हुंडई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट सातत्याने व दरवर्षी आपली उत्पादने आणि सेवांचा पोर्टफोलिओ वाढवत आहे. जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी ग्लोबल सीरिज ऑफ एक्स्कवेटरचो प्रक्षेपण केले व याचबरोबरच, कंपनीने आपल्या नवीन उत्पादने/मूल्य/सेवांचा विस्तार केला आहे, आणि पोर्टफोलिओ मध्ये ३ स्पेशल अटॅचमेंन्ट्स जोडल्या आहेत, ज्यात क्विक कपलर -एचक्युसी २२०, क्लॅमशेल-एचसीबी २२०,ऑरेंज ग्रॅपल – एचजीबी २२० आणि माईनिंग पोर्टफोलिओ विथ लाँच ऑफ माईट एचएक्स ३८० एलचा समावेश आहे.

यावेळी कंपनीला प्रमुख ग्राहक आणि विक्रेते यांचे प्रचंड समर्थन मिळाले. सर्वात नवीन आणि बहुप्रतिक्षित ३८ टी एक्स्कवेटर एचएक्स ३८० एल हे विशेषतः मार्बल आणि ग्रॅनाईटच्या खाणकामासाठी आणि हेवी ड्यूटीच्या खदान कामासाठी डिझाइन केलेले आहे. एचएक्स ३८० एल च्या प्रक्षेपणाने ३८ टी सेगमेंटमध्ये पुढील वर्षांमध्ये आघाडीचे स्थान मिळवने हे हुंडईचे ध्येय आहे. रॉक ब्रेकर्स, बकेट्स आणि नवीन लॉन्च केलेल्या विशेष अटॅचमेंटसह बी-टन ते ३८ टनापर्यंतची एकूण १० एक्स्कवेटर मॉडेल्स प्रदर्शित करण्यात आली. या कार्यक्रमाला हुंडईचे अधिकृत विक्रेते, मुख्य ग्राहक आणि कारखान्यातील प्रमुख वित्तीय भागीदार उपस्थित होते. कारखान्याच्या परिसरात मोकळ्या जागेत आयोजित केलेल्या या कार्यक्रमादरम्यान स्थानिक आणि केंद्र सरकारच्या कोविड प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले.

जे.एस. पार्क, व्यवस्थापकीय संचालक, हुंडई सी.ई. इंडिया ने स्पेशल अटॅचमेंट्स आणि एचएक्स ३८० एल चे अनावरण केले ते म्हणाले, “ह्युंदाई स्पेशल अटॅचमेंट्स आणि एचएक्स ३८० एल ह्युंदाई इंडियाच्या नाविन्यपूर्ण समाधानांसह भारतीय बाजारपेठेत सेवा देण्याची वचनबद्धता दर्शवतात. जी विशेष संलग्नक रचनेसह विकसित केली गेली आहेत. टिकाऊपणा आणि उच्च उत्पादकतेचे एचएक्स ३८०एल हे ग्रॅनाइट, संगमरवरी आणि हेवी ड्यूटी क्वॅरी सारख्या कठीन कार्यासाठी डिझाइन केलेले आहे . यात रॅग्डसह ग्रॅनाइट, संगमरवरी आणि हेवी ड्यूटी क्वॅरी जसे की रग्ड अंडरकेरेज, स्ट्रक्चर्स, बेस इन क्लास इंधन कार्यक्षमता आणि ऑपरेटर आराम देण्यासाठी सर्वोत्तम फिचर्स आहेत आहे. राजीव चतुर्वेदी, उपाध्यक्ष सेल्स एटींग, आफ्टर-सर्व्हिस आणि पार्ट्स यांनी हुंडई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट इंडिया प्रा. लि.बद्दल बोलताना सांगितले की. “सक्षम डीलरशिपच्या मजबूत नेटवर्कसह उत्कृष्ट दर्जाची उत्पादने एकत्र केलेल्या हुंडईला बांधकाम, पायाभूत सुविधा आणि खनन क्षेत्रात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. “

Leave a Reply

%d bloggers like this: