परतानी प्रतिष्ठानतर्फे गुरु-शिष्यांचा एकत्रित सन्मान

पुणे : समाजातील महत्वाच्या घटकांच्या कार्याची आठवण प्रत्येकाला रहावी, याकरीता विविध दिन साजरे केले जातात. सप्टेंबर महिन्यात शिक्षक दिन देखील उत्साहात साजरा होता. परंतु शिक्षक दिनी केवळ शिक्षकांचाच नाही तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करुन गुरु-शिष्याच्या नात्याचा गौरव करण्यात आला. शहराच्या पूर्व भागातील सोमवार, मंगळवार व रास्ता पेठेतील शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

स्व.सौ.मंगला परतानी सेवा प्रतिष्ठान, मंगळवार पेठ, पुणे व अ‍ॅड.नितीन परतानी मित्र परिवारतर्फे शहराच्या पूर्व भागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षक रामचंद्र देसले, मेघा कर्नावट, सपृना नायडू, आयोजक अ‍ॅड.नितीन परतानी आदी उपस्थित होते. शिक्षकांचा सन्मान संस्थेतर्फे करण्यात आला. तर, इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ६० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांचा सन्मान शिक्षकांच्या हस्ते झाला.

अ‍ॅड.नितीन परतानी म्हणाले, शिक्षक दिनी केवळ शिक्षकांचा सन्मान करण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांचा आणि शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसमोर शालेय जीवनापासून आपले शिक्षकच आदर्श व्यक्तिमत्व असते. त्यामुळे त्यांच्या हस्ते मिळालेला सन्मान विद्यार्थी कायम लक्षात ठेवतात. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी सन्मान सोहळा एकत्रितपणे करण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: