‘गणपती आले गणपती’ नविन गाण प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे : गेल्या दिड-दोन वर्षांपासून कोरोना महामारीचे संकंट जगावर असतांना याही वर्षी आद्य दैवत श्री गणेश महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे निर्देश शासन व सरकारने दिले आहे. उत्सवाचे स्वरूप जरी साधे असले तरी भक्तांच्या भावनां जल्लोषात असाव्यात या हेतूने एस. के. एस इव्हेंट आणि एंटरटेनमेंट द्वारे ‘गणपती आले गणपती’ हे बोल असलेले गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. आज गाण्याचे पोस्टर प्रदर्शित करत असतांना गणेशोत्सवाची भक्तीमय भेट म्हणून हे गाणे येत्या गुरूवारी ९ सप्टेंबर रोजी झी म्यूजिकसह सर्व संगीत टेलीव्हिजन चैनलवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

‘गणपती आले गणपती’ या गाण्याचे पार्श्वगायन प्रसिद्ध सिने गायक दिग्विजय जोशी यांनी केले असून सचिन घोरपडे यांनी संगीत व नृत्य दिग्दर्शन केले. मुख्य कलाकाराच्या भुमिकेत कमलेश शर्मा, बालाजी भोसगे, झेबा शेक तर बाल कलाकार क्ष्रती घोरपडे आहेत. संपूर्ण गाण्याची निर्मितीसाठी बालाजी भोसगे व शर्वरी साबळे तर सह निर्मिते म्हणून विकी शर्मा यांची साथ होती. सोबतच सचीन डान्स अकॅडमी, प्रशांत फसगे, तेजस सातपुते, योगेश दळवी, संग्राम गवळे,चैतन्य साळुंखे, विलास वीर, महेंद्र पाटील, अतिश शिंदे, मृदुला बेलगी, मारुती साबळे, राजाराम साबळे, जनूबाई दही हंडी उत्सव व श्री सिद्धीविनायक क्रिकेट क्लब पुणे यांच्येही सहकार्य मौलाचे होते.

निर्मात्या शर्वरी साबळे म्हणाल्या, एस. के. एस इव्हेंट आणि एंटरटेनमेंट नेहमीच उत्कृष्ट निर्मिती करण्यात आपला ठसा उमटवत आहे. अनेक गाणी व लघु चित्रपटानंतर येणाऱ्या श्री गणेशोत्सवाची भेट म्हणून गणपती आले गणपती’ या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या ९ तारखेला हे गाणे महाराष्ट्रातील सर्वात संगीत चॅनेलवर प्रदर्शित होत असून प्रेक्षकांना व गणेश भक्तांना गाण नक्की आवडेल असा विश्वास त्यांनी दिला. गाण्याचे बोल, व्हिडिओ व्हिज्युअल, संगीत, व कलाकृती चौफेर बाजूने उत्तम मांडणी केलेले गणपती आले गणपती हे गाण विघ्नहर्ता गणरायाचरणी अर्पण करून लवकरात लवकर जगावरच कोरोनाचे चे संकट नाहीसे हो अशा भवनात दिग्दर्शक सचिन घोरपडे यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: