मुलांच्या लसीकरणा बाबत केंद्राची ‘धोरण शुन्यता’ – गोपाळदादा तिवारी

पुणे : कोरोना’३री लाटेची शक्यता असतांना व त्याचा धोका १८वर्षा खालील मुलांना असल्याचे सांगितले जात असतांनाच, अमेरीकेतील नोव्होवॅक्स’ची आवृत्ती “कोवोव्हॅक्स” लस १८ वर्षा पर्यंतच्या मुलांसाठी पुरवण्यास “सिरम” सक्षमपणे तयार असतांना देखील केंद्र सरकारने मात्र ‘मानवी चाचण्या’स सिरम इन्स्टीट्यूट”ला इतरांच्या तुलनेत तब्बल ३-३।। महीन्यानंतर (मुलांवरील चाचण्यांना ‘केईएम व भारती हॅास्पीटल’मध्ये) परवानगी दिली… या करीता सु.३।। महीने वाया का घालवले(?) असा सवाल राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळदादा तिवारी यांनी ऊपस्थित करून केंद्र सरकारची (१८ वर्षा खालील) मुला-मुलींचे बाबत ‘केंद्र सरकारची निष्क्रीयता व धोरण शुन्यता’ स्पष्ट होते…’शाळा सुरू करण्यापुर्वीच’ वेगाने मुलांचे लसीकरण’ होणे व त्यांची प्रतिकारशक्ती (ईम्यूनिटी) वाढवणे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे व अत्यावश्यक आहे हे तरी किमान केंद्र सरकारला समजले पाहीजे..!

एकीकडे ‘भारत बायोटेक’ व कॅडीला’ला या दोन्ही कंपन्यांना लस सुरक्षीत असल्याचा अहवाल न घेताच “मानवी चाचण्या करण्यास” केंद्र सरकारने परवानगीही दिली… हे अजब आहे.. मात्र (लसीकरणात आधाडीची भूमिका बजावणाऱ्या) सिरम इंस्टीट्यूटच्या कोव्हॅक्स’ला मात्र ‘लहान मुलांवरील चाचण्या घेण्यास (लस सुरक्षीत असल्याचा प्रथम अहवाल देण्याची अट घालून) केंद्र सरकार अक्षम्य ऊशीराने परवानगी देते.. हे निंदनीय व निषेधार्य आहे.. जर ‘लहान मुलांकरीता लस येण्यास ऊशीर झाला….तर सर्वस्वी जबाबदारी केंद्राचीच राहील’, असा आरोप देखील त्यांनी त्याच वेळी केला होता…!!

एकीकडे कॅडीला (DNA टेक्नॅालॅजीने केलेली पहिलीच वॅक्सीन असूनही) जगात प्रथम वापरली जात आहे.. तरी ही त्यांचे कडून (लस सुरक्षीत असल्याचा अहवाल न घेतांच) चाचणीस परवानगी हा ‘असैध्दांतीक व अजब न्याय’ असल्याचा आरोप गोपाळ तिवारी यांनी केला..! वास्तविकता तर ही आहे की सिरम इन्स्टीट्यूट च्या “नोव्हॅक्स”ला USA च्या रेग्युलेटर्स ॲथाॅरीटीने अमेरीकेत हीच् चाचणी करण्यास केंव्हाच मान्यता दिली व तेथील सु.३००० (१८ वर्षाखालील) मुलांना चाचणी-लस देऊन झाली.. स्वदेशात मात्र सिरम ला ‘आकस व दूजाभाव’ सोसावा लागत आहे, हे देशाचे दुर्दैव आहे..!

या प्रसंगी राजीव गांधी स्मारक समितीचे जेष्ठ सदस्य व अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री राजीव जगताप यांनी शाळा सुरू होण्यापुर्वीच मुलांना लसीं देण्यात याव्यात’ असाच पालकांचा आग्रह असल्याचे सांगितले.. सॅनिटायझेशन, सोशल डिस्टसिंग इ मोठ्यां करीता आवश्यक आहे मात्र मुलांकरीता लसींचा किमान पहीला डोस तरी आवश्यक असून, ॲानलाईन मोबाईल उपकरणांद्वारे मुलांचे शिक्षण हे फार काळ समर्थनिय नाही.. ‘लसीं देऊन मुलांना शाळेत शिक्षण सुरू करणे’ हाच रामबाण ऊपाय असल्याचे सांगून केंद्राने ‘मुलांसाठीच्या’ लस निर्मितीकडे गांभिर्याने बघण्याची गरज असल्याचे सांगितले.. स्मारक समितीचे सदस्य मा सुर्यकांत मारणे यांनी पत्रकार व माध्यमांच्या सततच्या सहकार्या बद्दल आभार व्यक्त करून मा गोपाळदादा तिवारी यांनी प्रदेश काँग्रेसचे ‘राज्य – प्रवक्ते’ म्हणून ऊचललेले सर्व मुद्दे ‘राजीव गांधी स्मारक समिती’ माध्यमातून तडीस नेणार असल्याचे सांगितले..या प्रसंगी रामचंद्र ऊर्फ भाऊ शेडगे, सुभाष थोरवे, नितीन पायगुडे इ ऊपस्थित होते..!

Leave a Reply

%d bloggers like this: