प्रसिद्ध गायिका महालक्ष्मी अय्यर यांच्या गायन कार्यशाळेचे आयोजन  

पुणे : पुण्यातील अंतर्नाद कला अकॅडमीच्या वतीने शनिवार दि. १८ सप्टेबर रोजी सायं ४ वाजता प्रसिद्ध गायिका महालक्ष्मी अय्यर यांच्या एक दिवसीय गायन प्रास्ताविक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा ही विद्यार्थ्यांसाठी असून झूम या ऑनलाईन व्यासपिठावर आयोजित करण्यात येणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी रु ९९ इतके प्रवेश शुल्क असणार आहे.

या कार्यशाळेत गायिका महालक्ष्मी अय्यर या स्वरांना समजून घेणे, त्यासाठी आवश्यक रियाज, प्राणायाम, भारतीय शास्त्रीय संगीत, गाण्यामध्ये असलेल्या भविष्यातील संधी, स्टुडीओ व व्यासपीठावर गायन करीत असताना स्वर पातळीवरील नियंत्रण आदी विषयांवर उपस्थितांना स्वत: मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय कार्यशाळेतील प्रत्येक सहभागी विद्यार्थाला अंतर्नाद कला अकॅडमी तर्फे महालक्ष्मी अय्यर यांची स्वाक्षरी असलेले ई प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी http://antarnaadacademy.com/workshop या लिंक वर अथवा +91  8530636655 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: