ऑनलाईन शिक्षणपद्धतीमुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे – डॉ.एम.जी. ताकवले

पुणे : गेल्या काही वर्षात शिक्षणक्षेत्रात खूप बदल घडले आहेत. या बदलांमुळे शिक्षकांना वेगवेगळ््या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनासारख्या महामारीमुळे आॅनलाईन शिक्षणपद्धती आली. परंतु आज शिक्षण क्षेत्राचे  बाजारीकरण झाले असून स्वत:चा बिझनेस वाढविण्यासाठी अनेक खासगी कंपन्या आणि खासगी क्लासेसला पेव फुटले आहेत. त्यामुळे अशा काळात शिक्षकांची भूमिका आणि जबाबदारी वाढली असून ती विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार असल्याचे मत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठचे माजी कुलगुरू डॉ.एम.जी. ताकवले यांनी व्यक्त केले.

पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी व पुणे शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने शिक्षक दिनाच्यानिमित्ताने गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ््याचे आयोजन करण्यात आले. कात्रज येथील माऊली गार्डन कार्यालयात कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे (टिडीएफ) उपाध्यक्ष हनुमंत भोसले, राज्य कार्याध्यक्ष जी.के.थोरात,शरदचंद्र धारुरकर, प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत मोहोळ, शहर सचिव सुजीत जगताप,नगरसेविका मनिषा कदम, अविनाश ताकवले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात शहरातील ५० शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सन्माचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.  

डॉ.एम.जी.  ताकवले म्हणाले, एकाबाजूला शाळांमध्ये पहिलीपासून कॉम्प्युटर आहेत तर दुसºया बाजूला विद्यार्थ्यांना बसायला चांगले वर्ग देखील नाहीत. अशा परिस्थितीदेखील शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून तरीदेखील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षक करीत असतात, असेही त्यांनी सांगितले. 
संध्या गायकवाड म्हणाल्या, आज आॅनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी शिक्षकांच्या समोर आहेत परंतू त्यांच्या सानिध्यात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना भेटण्याची त्यांच्यापर्यंत पोहचण्याच्या प्रत्येक संधीचे शिक्षकांनी सोने केले पाहिजे, असे ही त्यांनी सांंगितले. हनुमंत भोसले, जी.के.थोरात, चंद्रकांत मोहोळ, अविनाश ताकवले अशा इतर मान्यवरांनी व सन्मानार्थी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.शिवाजी कामथे यांनी प्रास्ताविक केले. जितेंद्र देवकर व सचिन दुर्गाडे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष थोरात यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: