होंडातर्फे भारतातील पहिले व्हर्च्युअल दालन लाँच

गुरुग्राम : सुरक्षा व संपर्कविरहीत संवादाला प्राधान्य देत ग्राहकांबरोबरचे डिजिटल नाते दृढ करण्यासाठी होंडा टुव्हीलर्स इंडियाने आज होंडा बिगविंग व्हर्च्युअल दालन लाँच केले. व्हर्च्युअल रिअलिटीवर आधारित या प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांना होंडा बिगविंग या होंडाच्या एक्सक्लुसिव्ह प्रीमियम मोटरसायकल व्यवसाय विभागातून मिळणारी धमाल व साहस व्हर्च्युअल पातळीवर अनुभवता येईल.

ग्राहकांना खरेदीचा आनंद मिळवून देण्याचे होंडाचे तत्त्व जपण्यासाठी या प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांना मोटरसायकलची श्रेणीरायडिंग गियर, अक्सेसरीज घरबसल्या आरामात अगदी बारकाईने अनुभवता येतील. सध्या या प्लॅटफॉर्मवर होंडाची लोकप्रिय CB350 उपलब्ध असून लवकरच इतर प्रीमियम मॉडेल्सही उपलब्ध केली जातील.

ग्राहक अनुभव उंचावण्यावर होंडाचा भर असून त्याविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभागाचे  यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘व्हर्च्युअल शोरून लाँच करत आम्ही ग्राहकांना सर्व उत्पादने सहजपणे उपलब्ध करून देण्याचे तसेच त्याची सुरक्षा व सोयीस्करपणा यांवर भर देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आमच्या ग्राहकांच्या अनोख्या अपेक्षांचा समतोल साधत आज डिजिटल तंत्रज्ञानामुळे त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करणे शक्य झआले आहे. या व्हर्च्युअल इंरफेजवर होंडा बिगविंगअंतर्गत उपलब्ध करण्यात आलेल्या आमच्या प्रीमियम मोटरसायकल ग्राहकांना नक्कीच खूप आनंद देतील.’

ग्राहकांना प्रत्यक्ष दालनासारखाच अनुभव देणारे हे व्हर्च्युअल दालन उत्पादनाचे चौफेर रूपव्हर्च्युअल स्पेस तसेच व्हर्च्युअल चॅट सपोर्ट देते. ग्राहकाच्या ठिकाणानुसार त्याला पसंतीचा वितरक तसेच आवडत्या होंडा दुचाकीसाठी आवडीचे कस्टमायझेशन निवडण्याची सोय आहे.

देशस्तरावर बिगविंग नेटवर्क समाविष्ट झाल्यामुळे या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन नोंदणी, अपॅरल व मर्कंडायझेशन विभाग, हेल्मेट्स व जॅकेट्ससह संरक्षक गियर्स, होंडाचा प्रसिद्ध सीबी वारसा दर्शवणारे ‘सीबी कॉर्नर’ आणि इतक्या वर्षांतली होंडाच्या कामगिरीतले महत्त्वाचे टप्पे दर्शवणारी एक्सक्लुसिव्ह ‘मोटोजीपी वॉल’ उपलब्ध करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: