Tokyo Paralympics 2020 – 21 : भारताची ऐतिहासिक कामगिरी, तब्बल 19 पदकांची कमाई

टोकियो : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 19 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 5 सुवर्णपदकं, 8 रौप्य पदकं आणि 6 कांस्यपदकांचा समावेश आहे. इतिहासातील भारताची ही सर्वाधिक पदकांची संख्या आहे.

24 ऑगस्ट, 2021 रोजी सुरु झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धांचा आज (5 सप्टेंबर) शेवटचा दिवस होता. भारताचे सर्व खेळ संपले असून भारताने अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून स्पर्धेतील अप्रतिम कामगिरी सुरु ठेवली. आज शेवटच्या दिवशीही कृष्णा नागरला सुवर्ण तर सुहास यथीराजला रौप्य पदक मिळाले अन् शेवट गोड झाला. स्पर्धेमध्ये अवनी लेखरा व सिंहराज अधाना यांनी प्रत्येकी दोन पदकं जिंकून विक्रम केला आहे.

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी सात पदकं मिळवली होती. इतिहासातील ही सर्वाधिक पदकसंख्या होती. त्याच प्रमाणे टोकियो पॅरालिम्पिकमध्ये ही भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 19 पदकांची कमाई केली आहे.

भारताच्या नावावर असलेली एकूण पदके व खेळाडू

पाच सुवर्णपदकं  

अवनी लेखरा(नेमबाजी)

सुमित अंतिल ( भालाफेक)

प्रमोद भगत (बॅडमिंटन)

कृष्णा नागर (बॅडमिंटन)

मनीष नरवाल (नेमबाजी)

आठ रौप्यपदकं 

सिंहराज अधाना (नेमबाजी)

निशाद कुमारने (T-47 उंच उडी)

प्रवीण कुमार (T-44 उंच उडी)

मरियप्पन थंगावेलु (टी-६३ उंच उडी)

देवेंद्र झाझड़िया (भालाफेक)

सुहास यथिराज (बॅडमिंटन)

भाविना पटेल (टेबल टेनिस)

सहा कांस्य पदकं 

मनोज सरकार (SL3 बॅडमिंटन)

अवनी लेखरा (50 मीटर नेमबाजी)

सिंहराज अधाना (10 मीटर नेमबाजी)

हरविंदर सिंग (तिरंदाजी)

सुंदर सिंह गुर्जर (भालाफेक)

Leave a Reply

%d bloggers like this: