Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

लेखन कलेसाठी रियाजाची आवश्यकता- दिलीप माजगावकर

पुणेः लेखन ही गंभीर क्रिया असून लेखना व्यक्तिरिक्त असलेल्या कलांना जशी रीयाजाची आवश्यकता  असते तसाच रियाज लेखन कलेसाठी आवश्यक असल्याचे मत राजहंस प्रकाशनाचे प्रमुख दिलीप माजगावकर यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे प्रकाशन विश्वातील प्रदीर्घ वाटचाल आणि राजहंस प्रकाशनाद्वारे साहित्यविश्वात दिलेले योगदान लक्षात घेता राजहंस प्रकाशनाचे प्रमुख दिलीप माजगावकर यांना जीवनगौरव पुरस्काराने तर ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले, यावेळी झालेल्या प्रकट मुलाखतीत माजगावकर बोलत होते.राजहसं प्रकाशनचे लेखक ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांच्या प्रकट मुलाखतीद्वारे राजहंस प्रकाशन संस्थेचा आणि ओघाने माजगावकर यांचा जीवन प्रवास उलगडला.यावेळी २०१९ आणि २०२० या वर्षीच्या उत्कृष्ट ग्रंथ व दिवाळी अंक निर्मिती पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, डायमंड प्रकाशनचे दत्तात्रय पाष्टे उपस्थित होते. 
माजगावकर म्हणाले, इंटरनेटच्या लाटेत सुरुवातीला प्रकाशन व्यवसायीक धास्तावले परंतू काळाच्या कसोटीवर जे सकस आणि अस्सल असते तेच टिकते हे अनेक लाटांच्या पार्श्वभुमीवर सिद्ध झाले. तात्कालिक आणि गंभीर लेखन यातील फरक लेखक, प्रकाशक आणि वाचक या त्रयींना लक्षात आल्याने मराठी प्रकाशन व्यवसायावर कितीही संकटे आणि आवाहने आली तरी काळाच्या कसोटीवर प्रकाशन व्यवसाय पाय रोऊन उभा राहील.  1960 ते 1980 चा काळ हा सर्वच कलाक्षेत्रांसाठी सुवर्णकाल होता. नाटक, संगीत, साहित्य, मराठी चित्रपट अशा अनेक क्षेत्रात कार्यरत प्रयोगशील व्यक्तिमत्वांचा काहीतरी नवीन देण्याचा झगडा सुरु होता. त्या झगड्यातून उत्तम उत्तम कलाकृती जन्म घेत होत्या. प्रत्येत क्षेत्रातील प्रयोगशीलता रसिकांच्या मनाचा ठाव घेत होती.
ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे म्हणाल्या, आजचा पुरस्कार स्विकारतांना आनंद आणि संकोच अशा मिश्र भावना आहेत.श्री.द.माजगावकरांनी माझ्यातील लेखीका ओळखली आणि माझा सातत्याने पाठपुरावा करीत माझ्याकडून लिहुन घेतले. लिहिताना घ्यावयाची संदर्भ आणि भाषा सर्व पातळीवर माजगावकरांनी मार्गदर्शन केले. प्रकाशकांनी उत्तेजन दिले म्हणुन मी लिहीती झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading