Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

‘नव्या शिक्षण धोरणाचा औषधनिर्माणशास्त्रावर परिणाम’ विषयावरील वेबिनारला प्रतिसाद

पुणे: ‘नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा औषधनिर्माणशास्त्र शिक्षणावर परिणाम’या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’च्या रौप्यमहोत्सवानिमित्त या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.एम.आय.टी.वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे माजी अधिष्ठाता प्रा.बी.एस.कुचेकर यांनी मार्गदर्शन केले.संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार वेबिनारच्या अध्यक्षस्थानी होते.प्राचार्य डॉ.किरण भिसे,डॉ.शर्वरी हर्डीकर,डॉ.कांचन चौहान,डॉ राणी पोटावळे,स्वप्नील दौंडे,रजत सय्यद यांनी संयोजन केले.सहभागी झालेल्याना प्रमाणपत्रे देण्यात आली.

Leave a Reply