धनुष्यबाण हाच शिवसेनेचा उमेदवार शिवसेना कार्यकत्यांचा विश्वास; मंडई विद्यापीठ कट्ट्यावर शिवसैनिकांनी मांडली भूमिका
पुणे : सार्वत्रिक निवडणुकीमध्ये व्यक्ती किंवा चेहरा पाहिला जात नाही, तर धनुष्यबाण हाच शिवसेनेचा उमेदवार समजून शिवसैनिक काम करतात आणि पुढेही करतील. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचाच चष्मावर राहील, असा विश्वास आज पुण्यातील शिवसैनिक पदाधिकार्यांनी मंडई विद्यापीठ कट्टावर मांडला.
मंडई विद्यापीठ कट्टाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे समाजातील यांनी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हीजन २०२२ च्या अनुषंगाने संवाद सत्राचे आयोजन केले होते. प्रसंगी संजय मोरे (शिवसेना पुणे शहर प्रमुख), गजानन थरकुडे(शिवसेना पुणे शहर प्रमुख), अजय भोसले, विजय देशमुख (जिल्हाप्रमुख) रमेश कोंडे (जिल्हाप्रमुख), प्रशांत बधे, पृथ्वीराज सुतार (गट नेते, पुणे मनपा), शाम देशपांडे आदी उपस्थित होते. मंडई विद्यापीठ कट्टा,पुणे चे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी सर्व मान्यवरांचे सत्कार व सन्मान केला.
संजय मोरे म्हणाले, कोरोना महामारीचे सावट संपले नाही, त्यामुळे घर हेपण एक मंदिरच हीच सामान्य नागरिकांची भावना आहे. गणेशोत्सवही त्याच पद्धतीने साजरा होईल. मात्र, महापौर दुटप्पी भूमिका घेऊन नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. भाजपच्या आंदोलनामधे महापौरांनी मंदिर उघडा म्हणून घंटानाद करायचा आणि श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या कार्यक्रमामधे महापौर म्हणून पुणेकरांना गर्दी न करण्याचे आवाहन करायच. पुणेकर नागरिक सूज्ञ आहेत, त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मा चंद्रकांतदादा पाटील यांनी पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा केली. दादांनी हे लक्षात घ्याव, निवडणुकीआधी बंद दाराआड ज्यांनी शब्द दिला, जे ठरल त्यापासून निवडणूकीनंतर त्यांनी शब्द फिरवला याला पाठीत खंजीर खुपसणे म्हणतात. १०१४ विधानसभा निवडणुकीत आपण ऐनवेळी युती तोडली याला पाठीत खंजीर खुपसणे म्हणतात. दादा आपणास विस्मरण होऊ लागले आहे. असे संजय मोरे यांना विचारलेल्या प्रश्नावर सांगितले.
शिवसेना शहरप्रमूख संजय मोरे यांनी सांगितले की, भाजप भावनिक मुद्दा उपस्थित करून नागरिकांचे मन विचलित करीत आहे. दस्तुरखुद्द पुण्यनगरीचे प्रथम नागरिक महापौर दुहेरी भूमिका घेऊन कोरोना अजून वाढवत आहे. पुणेकर नागरिक हुशार आहेत, कोरोना महामारीचा ज्वर कमी झाला आहे. मात्र, संपला नाही, हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे सामान्य नागरिकसुद्धा आरोग्याची काळजी घेऊन सण साजरा करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
