Saturday, August 1, 2026
Latest NewsPUNE

परवानगी नसतानाही बिल्डरने केली महापालिकेच्या जागेची मोजणी…

2018 मध्येच केली मोजणी.. माहिती अधिकारात धक्कादायक बाब उघड..!

आंबिल ओढा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकरणात विकासक आणि प्रशासनाकडुन दिशाभुल

पुणे: आंबिल ओढा झोपडपट्टी कारवाई प्रकरण राज्यात गाजत असताना माहिती आधिकारातून अजून एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पुणे मनपाच्या मालमत्ता व्यवस्थापनाकडून मिळालेल्या पत्रानुसार सदर आंबिल ओढा फायनल प्लॉट २८ ही जागा आजही पुणे महानगर पालिकेच्या मालकीची असुन सदर जागा कोणत्याही विकसकाला हस्तांतरीत केली नासल्याने अटी शर्ती अथवा मोजणी करीता परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे नमूद केले आहे. मात्र बिल्डरने थेड झोपडपट्टी पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या संगनमताने भुमी अभिलेख विभागाची दिशाभुल करुन शासकिय मोजणी ‘क’ केली आहे.

बिल्डर केदार आसोसिएटस तर्फे सुर्यकांत उर्फे बाळासाहेब निकम व झोपडपट्टी पुनर्वसनच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने भुमी अभिलेख क्र१ विभागाची दिशाभुल करुन दिनांक १९/४/२०१८ रोजी शासकिय मोजणीची ‘क’ पर्यंत केली गेली आहे. तसेच दिनांक १/१०/२०२०रोजी प्राथमिक पात्रता यादिचे झोपडपट्टी पुनर्वसनच्या वतीने संकर्षण आधिकारी क्र ३ यांनी काढलेल्या पत्रकात जमिनीची मालकी हक्क प्राप्त आसलेल्या सस्थेचे नाव मे. केदार आसोसिएटस असे घोषित केले आहे. अशाप्रकारे संबधित बाब महापालिकेच्या सर्व आधिकाऱ्यांना ज्ञात असुन देखिल तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची कोणतीही नियमावली न पाळता स्थानिक झोपडपट्टी वासियांना दडपशाही व कारवाईचा धाक दाखवून विस्थापित करण्याचा प्रकार सातत्याने चालू आहे.

पुणे मनपा न्यायलयाच्या आदेशाप्रमाणे प्रशासन व झोपडपट्टी धारकांनी सहमतीने चर्चा केली व झोपडपट्टी वासीयांच्या मागणीचे निवेदन सादर केले असताना देखील (आज शनिवार दिनांक 4 सप्टेंबर) शासकीय सुट्टी असताना देखील उपयुक्त पुणे मनपा सक्षम अधिकारी अविनाश सपकाळ, क्षेत्रीय अधिकारी अविनाश महादळकर, कार्यकारी अभियंता काशीनाथ गांगुर्डे, चाळविभागाचे राकेश विटकर व इतर अधिकारी वर्ग स्थानिक आंबील ओढा झोपडपट्टी धारकांना आयुक्तांच्या नावे कारवाईचा बडगा दाखवून धमकवीत होते. अश्या प्रकारे पुणे मनपा झोपडपट्टी पुनर्वसन आणि विकासक यांच्या संगनमताने कायद्याची पायमल्ली करत आहेत ती थांबवावी आंदोलन करण्याचा पवित्रा स्थानिक रहिवाशांसह बहुजन एकता परिषदने दिला असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष किशोर कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading