‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून राज्यसरकार कडून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचा प्रयत्न, भाजपाचा आरोप

पुणे : ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून राज्यसरकार कडून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेतकरी मेळाव्यात करण्यात आला. तसेच भाजपच्या वतीने शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा न्यायालयीन लढा लढला जाईल. गरज भासल्यास यासाठी जन आंदोलन उभे केले जाईल, असाही सूर यावेळी उमटला.

भारतीय जनता पार्टी मुळशी तालुक्याच्या वतीने भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका अध्यक्ष ॲड. विनायक ठोंबरे पाटील यांनी पीएमआरडीए च्या आराखड्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी कायदेशीर मार्गदर्शन मेळावाचे आयोजन केले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माजी राज्यमंत्री संजय भेगडे उपस्थित होते.

भेगडे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी मार्फत वकिलांची फौज उभी करून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा न्यायालयीन लढाई लढू.  ही कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत गेली तरी भारतीय जनता पार्टी न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. यासाठी जन आंदोलन उभे केले जाईल.

याच वेळी भाजपा पुणे कायदा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अँड. संजय सावंत पाटील यांनी या आरक्षणासंदर्भात हरकती कशी घ्यावी? हरकती ला कोणते पुरावे जोडावेत. हरकत मान्य झाली नाही तर पुढे काय करावे? कोणत्या आरक्षणाचे फायदे-तोटे काय आहेत. यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

या मेळाव्यास भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष गणेशतात्या भेगडे,  भाजपा पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष किरण दगडे पाटील, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्या भारती विनोदे, पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस सुवर्णा जोशी, भाजपा पुणे जिल्हा किसान मोर्चा उपाध्यक्ष काळूराम गायकवाड, भाजपा पुणे जिल्हा कार्यालय मंत्री वसंत चोरघे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अनुपशेठ मारणे, भाजपा मुळशी तालुका महिला अध्यक्षा वैशाली सणस, उपाध्यक्ष तानाजी नाना हुलावळे, मनोहर सणस, उपाध्यक्ष मारुती कुरपे, उपाध्यक्ष समीर मारणे, उपाध्यक्ष संतोष साठे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष वेगरे गावचे सरपंच मिनाथ कानगुडे, रावडे गावचे सरपंच दीपक माझीरे, कार्यालयीन मंत्री आसदे गावचे उपसरपंच प्रविण भरम, अशोक सुर्वे, सुनील शिंदे, पांडुरंग जाधव, सुरेश ठोंबरे व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: