उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या कार्यालयास दिली सदिच्छा भेट

पुणे : उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सेंट्रल बिल्डींग, पुणे येथील महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि सहकार व पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार परिषदेच्या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन अनास्कर यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सहकार चळवळ सक्षम करण्यासाठी सहकार कायद्यामध्ये जे जे बदल आवश्यक आहेत त्याची शिफारस परिषदेने तात्काळ करावी, सहकार परिषदेसाठी राज्य सरकारकडून काय काय अपेक्षा आहेत त्याही सादर करण्याच्या सूचना श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: