अनिल देशमुख यांचा जावई सीबीआयच्या ताब्यात; देशमुख कुटुंबियांकडून अपहरण झाल्याची तक्रार

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतले. देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये चयुर्वेदी यांच्या नावाच अद्याप कोणताही उल्लेख नव्हता. त्यानंतर चतुर्वेदी-देशमुख कुटुंबियांनी त्यांचे अपहरण झाल्याची फिर्याद नोंदवली आहे.

वरळी येथील सुखदा इमारतीमध्ये गौरव चतुर्वेदी आले होते. तेथून ते बाहेर पडले असता त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयने ताब्यात घेतले. देशमुख यांच्या आनंद डागा या वकिलांनाही सीबीआयने ताब्यात घेतले. एकूण 10 जणांच्या पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार गौरव चतुर्वेदी हे देशमुख यांच्या वरळी इथल्या सुखदा इमारत येथे आले होते.

तिथून बाहेर पडल्यानंतर वरळी परिसरातच सी-लिंक जवळ त्यांची गाडी थांबवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. चतुर्वेदी यांच्यासह देशमुखांच्या वकिलांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांनी आज अनिल देशमुख यांचे जावई आणि त्यांच्या वकिलांना कुठल्याही नोटीसीशिवाय उचलून नेले असे कळते. हे अत्यंत गंभीर आहे. देशात मोदीशाही चालू आहे. नियम कायदे गुंडाळले गेले आहेत. हम कहे सो कायदा आहे असे मोदी सरकारने अधिकृतपणे जाहीर करून टाकावे. जाहीर निषेध! असं ट्‌वीट करत सचिन सावंत यांनी सीबीआयच्या कारवाईवर टीका केली.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचा अहवाल फुटला होता. त्यात देशमुख यांना क्‍लिनचिट मिळाल्याचे सांगण्यात आले होते. तो अहवाल फुटल्याची अंतर्गत चौकशी करण्यात आली. त्यात गौरव चतुर्वेदी यांचे नाव समोर आले. त्यामुळे या कटात आणखी कोण सहभागी आहे, हे शोधण्यासाठी चतुर्वेदी यांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: