fbpx

अमिताभ बच्चन यांचा आवाज आता अॅलेक्सावर लाइव्ह

पुणे : अॅमेझॉनने आज अॅलेक्सावर पहिल्यांदाच भारतीय सेलिब्रिटीच्या आवाजाची सुविधा उपलब्ध होत असल्याची घोषणा केली आणि हा आवाज असणार आहे भारतीय सिनेमाचे लिजेंडरी आयकॉन श्री. अमिताभ बच्चन यांचा. भारतीय ग्राहकांना अमित जींचा आवाज जोडण्यासाठी एको डिव्हाईसवर अॅलेक्सा एक्स्पिरिअन्स निवडता येईल किंवा अॅमेझॉन शॉपिंग अॅपवर (फक्त अँड्रॉईड) माइकचं आयकॉन दाबूनही ही सुविधा मिळवता येईल. यासाठी १४९ रु. प्रतिवर्ष ही शुभारंभाची किंमत आहे. ही सुविधा खरेदी करण्यासाठी फक्त ‘अॅलेक्सा, इंट्रोड्युस मी टू अमिताभ बच्चन’ इतकंच म्हणा आणि ‘अमित जी’ असा वेक वर्ड वापरून बच्चन यांच्या आवाजाशी संवाद साधा.

बच्चन यांनी निवडलेल्या सेलिब्रिटी एक्स्पिरिअन्समध्ये त्यांच्या आयुष्यातील प्रसंग, त्यांच्या वडिलांच्या निवडक कविता, टंग ट्विस्टर, प्रेरणादायी विचार आणि असं बरंच काही असणार आहे. शिवाय, अनोखा आणि मनोरंजक कंटेंटही यात आहे. ग्राहकांना संगीत, अलार्म लावणे तसेच हवामानाची माहिती हे सारे श्री. बच्चन यांच्या खास स्टाईलमध्ये ऐकता येईल. खरेदी, सर्वसामान्य माहिती, रुटिन्स, स्मार्ट होम कंट्रोल, कौशल्ये आणि इतर असंख्य कामांसाठी अॅलेक्सा आहेच.

एकदा सेटअप पूर्ण झाला की तुम्ही ‘अमित जीं’ना प्रेरणादायी बोलण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी, तुम्हाला आनंदी करण्यासाठी अगदी रोज विनंती करू शकता. तुमच्या समर्थित डिव्हाईसेसवर जी भाषा अॅलेक्सासाठी वापरता तीच भाषा अमित जींच्या व्हॉईस एक्स्पिरिअन्ससाठी वापरता येईल. तुमच्या एको डिव्हाइसवर तुम्ही इंग्रजी, हिंदी किंवा दोन्ही भाषांमध्ये अॅलेक्सा आणि अमित जींशी संवाद साधू शकता. भाषा बदलण्यासाठी तुमच्या अॅलेक्सा अॅपवर डिव्हाइस सेटिंग्जला जा किंवा तुमच्या एको डिव्हाईसला सांगा “अॅलेक्सा, स्पीक इन हिंदी”. सुरुवातीच्या काळात अॅमेझॉन शॉपिंग अॅपवर अमित जी आणि अॅलेक्सा फक्त इंग्रजीतच संवाद साधतील.

अमिताभ बच्चन म्हणाले की अॅलेक्सासाठी माझा आवाज देताना अॅमेझॉनसोबत काम करणं हा एक नवाच अनुभव होता. यात व्हॉईस टेक्नॉलॉजी आणि कलात्मक सर्जनशीलतेला एकत्र आणून एक वेगळीच कमाल साधण्यात आली आहे. मला फार छान वाटतंय की आता माझे चाहते या नव्या माध्यमातून माझ्याशी संवाद साधू शकतील आणि त्यांना हा अनुभव कसा वाटतो ते जाणून घेण्यासही मी उत्सुक आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: