एनएफएआयचे ऑनलाईन फिल्म पोस्टर प्रदर्शन “चित्रांजली@75” चे उद्घाटन

पुणे : देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशभरात, “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. याचाच भाग म्हणून, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे ने एका विशेष आभासी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. “चित्रांजली@75: अ प्लॅटिनम पॅनोरामा” (Chitranjali @ 75 : A Platinum Panorama) असे या प्रदर्शनाचे शीर्षक आहे.

दृश्य दस्तऐवजांचा पॅनोरामा असलेल्या या ऑनलाईन प्रदर्शनात, देशालां स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या 75 वर्षांतील ठळक घटनांचा मागोवा घेण्यात आला आहे. या डिजिटल संग्रहात, भारतीय चित्रपटातून, देशाच्या स्वातंत्र्यसेनानींचे आणि आपल्या वीर सैनिकांचे शौर्य आणि बलिदानाच्या गाथांचे गौरवगान चित्रित केलेले आहे. या प्रदर्शनात, अशा चित्रपटांचीही झलक आहे, ज्यातून हाताळण्यात आलेल्या सामाजिक प्रश्नांचा जनमानसावर परिणाम झाला आणि त्यातून सामाजिक सुधारणांचा मार्ग मोकळा झाला. तसेच, आपल्या सैनिकी गणवेशातले आपले नायक- आपल्या जवानांच्या शौर्यगाथांची झलक या प्रदर्शनात आपल्याला बघायला मिळेल.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ‘आयकॉनिक विक ऑफ आझादी का अमृत महोत्सव’ या विशेष उपक्रमाचा भाग म्हणून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, भारतीय सिनेमा ही देशाची सॉफ्ट पॉवर असून जागतिक व्यासपीठावर भारताची ओळख निर्माण करण्यात या चित्रपटसृष्टीचे योगदान महत्वाचे आहे.

‘चित्रांजली@75’, प्रदर्शनात, 75 फिल्म पोस्टर्स तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून भारतातल्या विविध भाषांमधील चित्रपटातले देशभक्तीचे विविध रंग दाखवण्यात आले आहेत. हे प्रदर्शन तीन भागात विभागण्यात आले आहे. “सिनेमाच्या कॅमेरा नेत्रातून स्वातंत्र्यलढा’, ‘सामाजिक सुधारणांविषयीचे चित्रपट’ आणि ‘वीर सैनिकांना सलाम’ असे हे तीन विभाग आहेत.

‘सिनेमाच्या कॅमेरा नेत्रातून स्वातंत्र्यलढा’- या विभागात, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या रोमहर्षक कथा विविध भाषांमधील चित्रपटातून दाखवण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यसेनानींचे शौर्य आणि त्याग याला चित्रपटातून सर्वसामान्यांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोचवण्यात आले आहे आणि या वीरगाथा पुढेही अनेक पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या ठरतील.

‘‘सामाजिक सुधारणांविषयीचे चित्रपट’’- या विभागात, भारतीय चित्रपट आणि विसाव्या शतकातील सुरुवातीच्या दशकातला राष्ट्रीय स्वातंत्र्यलढा यांच्यातील परस्परसबंध दर्शवण्यात आला आहे. ‘सॅल्यूटिन्ग द ब्रेव्ह सोल्जर्स ‘ ही  सशस्त्र दलांच्या शौर्याला योग्य आदरांजली  आहे.

प्रदर्शन पाहण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

https://www.nfai.gov.in/virtual-poster-exhibition.php

Leave a Reply

%d bloggers like this: