‘कोण होणार करोडपती कर्मवीर विशेष’ भागात लेफ्टनंट कनिका राणे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

पुणे :  भारत देशाच रक्षण करताना मेजर कौस्तुभ राणे हे शहीद झाले. त्यांचे हे देशसेवेच व्रत पुढे नेण्यासाठी त्यांच्या पत्नी लेफ्टनंट  कनिका राणे या स्वतः सैन्यात भरती झाल्या. नोव्हेंबर २०२० मध्ये कनिका आर्मीमध्ये रुजू झाल्या. आता कनिका यांना कौस्तुभ यांची स्वप्नं पूर्ण करायची आहेत आणि अनेक वीरपत्नींसाठी काम करायचं आहे.

‘कोण होणार करोडपती कर्मवीर विशेष’ मध्ये बॅटल कॅज्युअल वेल्फेअर फंड या संस्थेसाठी त्या खेळायला येणार आहेत. या खेळात त्यांना साथ देणार आहेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांनी सोनालीला पाहिलेलं आहे.  सोनाली आणि लेफ्टनंट कनिका मिळून हा ज्ञानाचा खेळ खेळणार आहेत. कनिका यांनी मंचावर कौस्तुभ यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय कसा घेतला, हेही सांगितलं.या वेळी कनिका यांनी आपल्या कोटला एक पिन लावली होती, सचिन खेडेकरांनी त्याबद्दल विचारल्यावर ‘ती मेजर कौस्तुभ यांची असून त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ती लावली असल्याचं’ त्यांनी सांगितलं.

या मंचावर जिंकलेल्या पैशातून लेफ्टनंट कनिका राणे आणि सोनाली कुलकर्णी या बॅटल कॅज्युअल वेल्फेअर फंड या संस्थेला मदत करणार आहेत पाहा. कोण होणार करोडपती हा कर्मवीर विशेष भाग २८ ऑगस्ट, शनिवारी रात्री ९ वा. फक्त सोनी मराठीवर प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: